सोलापूर – श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक-भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशांत वराळे , उदयसिंग साळुंखे व शशी हुंडेकरी यांच्या हस्ते प्रसाद वाटप शुभारंभ करण्यात आला. यावेळी हत्तुरचे प्रतिष्ठित नागरिक अनिल भरले, अब्दुल गनि शेख, भिमाशंकर कनपवडीयर, सिद्धाराम म्हेत्रे , भिमाशंकर सतुबर, जोत्यप्पा सिनेवडीयर, राजकुमार कनपवडियर यांच्यासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णाप्पा गि. सतुबर व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, हितचिंतक, सभासद व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांच्या सेवेसह सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल श्री सोमेश्वर पतसंस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महाप्रसाद वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशांत वराळे , उदयसिंग साळुंखे व शशी हुंडेकरी यांनी उपस्थित भाविकांना वाढत्या सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणुकी (स्कॅम) बद्दल मार्गदर्शन केले. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँकेचे OTP कोणाला देऊ नये, याबाबत त्यांनी जनजागृती केली. तसेच तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना माहितीपत्रक देऊन ऑनलाईन फसवण्याचा पासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















