कुर्डुवाडी – कुर्डुवाडी शहर ऐतिहासिक आणि अत्यंत भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले. निमित्त होते उत्तराध्ययन सूत्र ची भव्य शोभायात्रा.भगवान महावीरांनी आपल्या अंतिम समयी जी देशना दिली होती, ती ऐकण्यासाठी एकेकाळी अठरा देशांचे राजे पावापुरी येथे आले होते. त्याच भव्यतेची आठवण करून देणारी शोभायात्रा येथे काढण्यात आली.शहरात जैन साध्वी प.पु सुनंदाजी आदि ठाणा ७ यांचा चातुर्मास चालु आहे. या निम्मिताने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये साधू, साध्वी, गणधर, इंद्र, इंद्राणी यांच्यासह १८ देशाचे राजे राणी आसे वेश परिधान करुन श्रावक श्राविका सहभागी झाले होते.अध्यक्ष केतन संचेती प्रशांत धोका, आनंद कोठारी, राहुल आगरचंद धोका, अभिजीत धोका, चेतन संचेती, रुपेश डागळे, आनंद धोका, राहुल चंद्रकांत धोका, रोहन धोका, प्रीतम धोका, निखिल धोका, किरण धोका, करण बोलदोटा, लखन संचेती, मयूर बाफना, विपुल धोका, अमित सोळंकी ,संदीप धोका, सचिन धोका,यश डागळे,अरिहंत कोठारी, यश संचेती,प्रवीण धोका आदिनी अठरा देशांच्या राज्यांच्या वेशभूषेत, तसेच इंद्र, इंद्राणी, नगरसेठ व नगरसेठानी अशा विविध रूपांत सहभाग नोंदवला होता. उत्तराध्ययन सूत्राची सुशोभित पालखी आणि भव्य झांकी ही या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते.ही भव्य शोभायात्रा कुर्डुवाडीच्या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी देण्यात आलेल्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या विलोभनीय शोभायात्रेने भक्तीमय वातावरण निर्माण केले होते.
Post Views: 8