नवीन नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव २०२६ निमित्त शासन निर्णयानुसार कार्यक्रमाचे आयोजन; आयोजन समितीच्या वतीने दिनांक १ एप्रिल रोजी प्राथमिक नियोजन बैठक घेण्यात आली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा वद्यापीठ नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून महापुरुषांच्या जयंतीचे आयोजन करण्यात येते. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव -२०२६ दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने जयंती महोत्सवाची प्राथमिक रूपरेषा सदरील बैठकीत ठरवण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनिता पाटील, डॉ. रवींद्र एन. सरोदे, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. पी विठ्ठल, डॉ. राजपाल चिखलीकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. हर्षवर्धन दवणे स्वप्निल नरबाग, डॉ जाधव, सिद्धार्थ वाघमारे, काळबा हानवते ,बंडू कांबळे, जालिंदर गायकवाड, सिद्धांत ढवळे, संदीप एडके, पुंडलिक गच्चे, शशिकांत लोहबंदे, शेख रशीद, आनंद कदम, शरद लोखंडे, संमेक सरपे, सुरेश वाठोरे, जयवंत आठवले, श्रीकांत वाघमारे, अनुपम सरोदे, अमोल करंडे, विकी टाकळीकर, संविधान दुगाने यांच्यासह मान्यवर प्राध्यापक विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या बैठकीचे प्रास्ताविक डॉ. हर्षवर्धन दवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप एडके यांनी मानले.


















