उमरी ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या अनुषंगाने उमरी येथे शिवसेना माजी नगराध्यक्ष तसेच तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी उमरी शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कुठे ही पैसे न देता हे फॉर्म भरावयाचे आहे व कोणत्या ही कागदपत्रांची आवश्यकता असल्यासअडचणी निर्माण होत असल्यास मला संपर्क साधा असे मार्ग दर्शन करते वेळीस तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार यांनी आश्वासन दिले .
त्यावेळी अनेक महिलांना मोफत फॉर्म वाटप करण्यात आले व काही महिलांचे फॉर्म भरून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .त्यासोबत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातील टीमच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले नारीशक्ती ह्या ॲप ला लागणारी कागदपत्रे यासंदर्भात मार्गदर्शन केले त्यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा कडून कान्हा शिरसाट बालाजी घाडगे, शुभम बैनवाड व शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ अरगुलवार , माधव सोळंके बालाजी जाधव , साईप्रसाद पेरेवार आदी उपस्थित होते.


![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=120%2C86&ssl=1)




















