बार्शी – ग्रामसेवकांकडे घरकुलाबाबत का चौकशी करतो या कारणावरुन शिवीगाळी करीत लोखंडी गजाने, हाताने तिघांनी मारहाण करुन जखमी केले असून तुझ्या पोराला व कुटुंबाला संपवून टाकतो अशी धमकी दिल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप तुकाराम मांजरे, शेखर वैजीनाथ मारकड व सज्जन धनंजय मांजरे (सर्व रा. देवगाव, ता. बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
किशोर लक्ष्मण मांजरे (वय ४९, धंदा शेती रा. देवगाव) यांनी फिर्याद दाखल केली ही घटना बुधवार (ता. २३) रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.
Post Views: 22