शिंगोली गावाजवळ रस्ते अपघातात मार्डीचा इसम ठार
सोलापूर – रस्ते अपघातात एक 50 वर्षीय व्यक्ती जागीच ठार झालेल्या अवस्थेत मंगळवेढा सोलापूर मार्गावर शिंगोली गावाजवळील नदीच्या ब्रिजवर रविवारी संध्याकाळी आठ वाजता मिळून आला .
अण्णासाहेब मच्छिंद्र बंडगर (वय 50 वर्ष , रा . मार्डी , उत्तर सोलापूर ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे . रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिंगोली गावाजवळील नदीच्या ब्रिजवर रस्त्या अपघात झाला .त्यात अण्णासाहेब बंडगर हे गंभीर जखमी होऊन जागीच अमृता वस्तीत पडल्याचे आढळून आले . ही खबर समजताच एका रुग्णवाहिकेतून त्यांना येथील शासकीय रुग्णालयात रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोयता व चाकूने हल्ला – सांगवी येथे दोघे तरुण जखमी
सोलापूर – मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून दोघा तरुणांना एका जमावाने कोयता , चाकू व ब्लेडने हल्ला करून जखमी केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील सांगवी (बु ) येथे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली .
रोहन रामहरी पालकर (वय 25 वर्ष ) आणि सुनील ज्ञानेश्वर शिंदे (वय 24 वर्ष , दोघे रा. कोळेकरीवाडी , अक्कलकोट ) अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत .वरील दोघे तरुण हे रविवारी संध्याकाळी सांगवी येथील बस स्टॉप येथे असताना त्यांना रमजान मुल्ला , आलम मुल्ला व इतर 25 जणांनी मिळून मारहाण केली . यात सर्वांगास मुकामार व जखम झाल्याने त्यांना अक्कलकोटच्या आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात मित्र मदनकुमार राठोड याने आज सोमवारी पहाटे दीड वाजता दाखल केले .
धाईटे येथे शेती बांधाच्या वादातून बाप व मुलास दगड – काठीने मारहाण
सोलापूर – शेतातील बांधाच्या वादातून एका बाप व मुलाला दगड काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील धायीटे येथे रविवारी घडली .
कुबेरदास अण्णा कीर्तके (वय 70 वर्ष ) आणि पंकज कुबेरदास कीर्तके (वय 40 वर्ष , दोघे राहणार धाईटे ) अशी मारहाण झालेल्या त्या दोघांची नावे असून ते रविवारी सकाळी स्वतःच्या शेतात असताना शेती वादातून त्यांना राजू लक्ष्मण भोसले ,ओंकार लक्ष्मण भोसले व इतर एकाने मारहाण केली . यात जखमी झाल्याने त्यांना सांगोला येथील आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात रात्री आठ वाजता ते स्वतः दाखल झाले .
वीरशैव नगरात एकाची केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 43 वर्षीय इसमाने घरातील छताच्या लोखंडी पट्टीला केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर रोडवरील वीरशैव नगरात रविवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली .
गुरुनाथ शरणप्पा मरगुर (वय 43 वर्ष , रा. वीरशैव नगर , विजापूर रोड सोलापूर ,मूळ राहणार – गुब्याड ,ता इंडि ,जी विजापूर )असे त्या गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे . रविवारी दुपारी गुरुनाथ यांचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतल्याने पलंगावर गुडघ्यात पाय मुडपून पडलेल्या अवस्थेत आढळून आला . तेव्हा पत्नी उर्मिला व मेव्हणा वीरेश भोगडे यांनी ही माहिती विजापूर नाका पोलिसांना दिली असता सहाय्यक फौजदार एम.जी. शेख यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता शव विच्छेदनासाठी दाखल केला . मयत गुरुनाथ मरगुर हे मिळेल ते काम करायचे . त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 2