Wednesday, November 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंद्रूपकरांची तहान कायम; १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली? 

तरुण भारतbyतरुण भारत
June 14, 2026
in soalpur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या संतापाचा बांध फुटू लागला आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्वसामान्यांना वणवण भटकावे लागत असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याची टीका होत आहे. विद्युत पंपातील बिघाड, जलवाहिनी फुटणे आणि भीमा नदीतील पाण्याची कमतरता ही कारणे पुढे केली जात असली, तरी नागरिकांच्या मते ही कारणे आता नेहमीची झाली असून मूळ प्रश्न नियोजनाच्या अभावाचा आहे.
मंद्रूपसाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. याशिवाय टाकळी येथील जुनी जलवाहिनीही अस्तित्वात आहे. मात्र दोन – दोन योजना उपलब्ध असतानाही गावाला नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही गावाची तहान भागत नसेल, तर त्या योजनेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
    ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा होणे अपेक्षित असताना काही पदाधिकाऱ्यांचे लक्ष इतर प्रशासकीय घडामोडींमध्ये अधिक गुंतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे “पाण्यापेक्षा राजकारण महत्त्वाचे की नागरिकांचे हाल ?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर गावातील पाणीप्रश्नाला राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू आहे. पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नावर उपाययोजना करण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये वेळ जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी सामान्य नागरिक मात्र पाण्याच्या एका हंड्यासाठी भटकंती करण्यास मजबूर झाले आहेत.
विशेष म्हणजे ग्रामपंचायती तील सत्ताधारी आणि विरोधी गट या दोघांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पाणीटंचाई दूर करण्यात अपयशी ठरत असताना विरोधकांकडूनही प्रभावी पाठपुरावा होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावभर रंगली आहे.
मंद्रूपची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक असूनही महिनाभर पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून, तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी या प्रश्नात हस्तक्षेप करून मंद्रूपकरांची तहान भागविणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…
चौकट
..
अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास
…
“मंद्रूपला नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होऊन एक वर्ष झाले. सरपंच व ग्रामसेवक यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे १४ कोटी रकमेची योजना सध्या फेल झाली असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.”
– जावीद आवटे, तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, दक्षिण सोलापूर
…
चौकट
…
पाण्यावर राजकारण सुरू
…
“ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत गटाची सत्ता असताना टाकळीच्या जुन्या पाईपलाईन वरून मंद्रूपला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या १४ कोटींची नवीन जलवाहिनी व टाकळी येथील जलवाहिनी दोन्हीही योजना सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासन पाणीटंचाई दूर करण्यात अपयशी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवाला मतदारांना दोष देणे चुकीचे आहे. मंद्रूप पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायतीने मागणी केल्यास पंचायत समितीकडे पाठपुरावा करू “
– मळसिद्ध मुगळे, पंचायत समिती सदस्य, मंद्रूप
….
ग्रामसेवक मागणीला जोर ?
…
स्थानिक ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांची तीन महिन्यापूर्वी बदली झाली आहे. कुशाबा इंगळे रजेवर गेल्याची संधी साधून ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकार्‍यांनी दक्षिणच्या बीडीओंकडे पुन्हा जोडमोटे यांची मागणी केली आहे. पाणीटंचाई दूर करण्या साठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याऐवजी पदाधिकारी ‘स्व’हित साधण्यासाठी पुन्हा ग्रामसेवक जोडमोटे यांची मागणीत मग्न असल्याने नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Views: 70
Previous Post

कवी मारुती कटकधोंड ‘काव्य परिमल’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Next Post

जागतिक योग दिनाच्या प्रचारासाठी सोलापुरात भव्य ‘योगदिंडी’ उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जागतिक योग दिनाच्या प्रचारासाठी सोलापुरात भव्य 'योगदिंडी' उत्साहात

ताज्या बातम्या

#breakingnews #diwalispecial #bjp #solapurnews

November 11, 2026

दिवाळी पाडव्याला सोलापुरात बससेवेचा शुभारंभ!

November 11, 2026

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1489538

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!