Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनोज जरांगेंचा मोर्चा उद्या नवी मुंबईत धडकणार, अवजड वाहनांना प्रवेशबंदी, मुक्काम कुठे असणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 24, 2024
in maharashtra
0
मनोज जरांगेंचा मोर्चा उद्या नवी मुंबईत धडकणार, अवजड वाहनांना प्रवेशबंदी, मुक्काम कुठे असणार?
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा मोर्चा आज पुण्यात असून मुक्काम लोणावळा येथे होणार आहे. त्यानंतर उद्या मनोज जरांगे नवी मुंबईत पोहोचतील.

 

 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने त्यांची व्यवस्था केली जात आहे. त्यानुसार, बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजार आवारात या मोर्च्याचा मुक्काम होणार असून महिलांची राहण्याची व्यवस्था सिडको प्रदर्शन केंद्रात करण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबईतील समन्वयकांनी दिली आहे. मात्र या मोर्च्यात येणाऱ्या कोट्यवधी मराठा बांधवांसाठी महापालिकेकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.

 

 

२५ जानेवारी रोजी कोट्यवधींच्या संख्येने मराठा समाज नवी मुंबईत दाखल होणार आहे. या नियोजनाच्या तयारीसाठी ‘मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय, वॉररूम’ तयार करण्यात आले आहे. मराठा आरक्षण दिंडी मोर्चा २५ जानेवारी रोजी नवी मुंबईमध्ये मुक्कामी आहे. या दिंडी मोर्च्यात सहभागी असलेल्या मराठा समाजाच्या सोयीसाठी गाड्या पार्किंग, राहण्याची व्यवस्था, नैसर्गिक विधी व इतर सोयींसाठी कांदा बटाटा व लसूण मार्केटमधील बाजार आवारात व्यवस्था करण्यात आली आहे.

 

२५ जानेवारी रोजी सिडको प्रदर्शन केंद्रात महिलांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच, करावे येथील तांडेल मैदान येथे आणि एपीएमसी मार्केट बंद ठेवून त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई केमिस्ट आणि ड्रग असोसिएशनच्या वतीने आरोग्यसुविधा सज्ज ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात ५० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. प्रत्येक दोन किमीवर वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे.

 

२६ जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाखोंच्या संख्येने तिरंगा फडकवून हा मोर्चा पुढे मुंबईत जाणार आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याची तसेच पाण्याची, शौचालयांची व्यवस्था करण्याबाबत महापालिका, सिडको, पोलिस तसेच एपीएमसी प्रशासन यांच्याशी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने पत्रव्यवहार केला आहे. या नियोजनात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे; मात्र नवी मुंबई महापालिकेकडून या संदर्भात अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पाणी, फिरते शौचालय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे; मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सरकारकडून निर्देश नसल्याचे सांगितले. यावरून सरकार या मोर्चाला गंभीरपणे घेत नाही, असा आरोप यावेळी विनोद पोखरकर यांनी केला आहे. संध्याकाळी उशिरा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिका संबंधित अधिकारी यांची या विषयावर एक बैठक सुरू होती. त्या बैठकीत या आंदोलनकर्त्यांना सुविधा देण्यावर निर्णय घेतला जाणार होता.

 

 

बाजार आवार बंद?

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाजार आवारातील कामकाज गुरुवार, २५ जानेवारी रोजी बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती आहे. बाजार घटकांकडून याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

 

 

वाहनांना प्रवेशबंदी

नवी मुंबई २५ जानेवारी रोजी रात्री १२ ते २६ जानेवारी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्यास, वाहने उभी करण्यास, शहरातील सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Post Views: 80
Previous Post

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात

Next Post

ज्योतिरादित्य शिंदेंची चंबलच्या खोऱ्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ज्योतिरादित्य शिंदेंची चंबलच्या खोऱ्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’

ज्योतिरादित्य शिंदेंची चंबलच्या खोऱ्यात 'सर्जिकल स्ट्राईक'

ताज्या बातम्या

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1230683

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!