Wednesday, July 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चिपळूणमध्ये विवाहितेला केले आत्महत्येस प्रवृत्त, सासू, जाऊ, नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2024
in maharashtra
0
चिपळूणमध्ये विवाहितेला केले आत्महत्येस प्रवृत्त, सासू, जाऊ, नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विवाहितेची छळवणूक करणे, तिला शिवीगाळ करणे व तिला आत्महत्या करणेस प्रवृत्त करणे या गुन्हयासाठी डॉ. अनिता एस. नेवसे मा. जिल्हा न्यायाधीश-१ व अति सत्र न्यायाधीश, चिपळूण यांनी जिल्हा न्यायालयात आरोपी सासू हिरा मधूकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर व नणंद पुष्पा रत्नाकर जांभारकर या तीन्ही आरोपींना भा.द.वि. कलम ४९८-अ, ३०६, ५०४ सह ३४ हया गुन्हयांखाली सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय धरून प्रत्येकी १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व प्रत्येकी ८०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा ठोठावली.

गुन्ह्याची सविस्तर हकिकत अशी की, सदरहू गुन्हा मौजे असगोली खारवीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे दिनांक १४/०९/२०१७ रोजी १२ वाजणेचे सुमारास घडला असून यातील फिर्यादी आरती मंगेश नाटेकर (मयत), आरोपी नं १ हिची सून होती. फिर्यादीचे लग्न होवून सुमारे ११ वर्षांचा कालावधी झालेला होता व तिला निल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आहे. फिर्यादीचा नवरा मंगेश मधूकर नाटेकर हा मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करीत होता. तिन्ही महिला आरोपींनी संगनमताने फिर्यादी हिने तिच्या सामाईक घरात सुखाने व आनदाने संसार करू नये व निघून जावे या उद्देशाने तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला वेळोवेळी शिवीगाळ व अपमानित करून आत्महत्या करणेस भाग पाडले त्यामुळे दिनांक १४/०९/२०१७ रोजी सून आरती जमिनीवरून पाय घसरून पडल्याने आरोपीला तिचा धक्का लागलेचे कारणावरून सासू हिरा नाटेकर हिने पुन्हा सूनेची शिवीगाळ करून छळवणूक केली.

त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आरती मंगेश नाटेकर हिने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनेत सून आरती ९५ टक्के भाजली. तिने तिचा मृत्यूपूर्व जबाब सरकारी दवाखान्यामध्ये दिला त्यामध्ये तिन्ही आरोपीविरूध्द तिने तक्रार दिली. त्यावरून प्रथम ४९८ (अ), व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. आरती रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे मयत झाली. त्यामुळे कलम ३०६ हे वाढीव कलम लावून सदरचा खटला चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये चालला. सरकार पक्षातर्फे अॅड. श्री. प्रफूल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले व खटल्यातील मृत्यूपूर्व जबाब आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ या बाबी शाबित करण्यासाठी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले.

सर्व साक्षीपुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच मयताचा नवरा यांनी सत्याच्या बाजूने आपली आई, बहिण व भावजय यांचेविरूध्द दिलेली साक्ष ग्राहय मानून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपींना दोषी ठरवून भा.द.वि कलम ३०६ च्या गुन्हयासाठी १० वर्षे सक्तमजूरी व ५०००/- रू दंड, कलम ४९८ (अ) गुन्हयासाठी ३ वर्षे सक्तमजूरी व प्रत्येकी २०००/- रू. दंड, ५०४ गुन्हयासाठी २ वर्षे साधा कारावास व १०००/- रू दंड अशी शिक्षा तिन्ही महिला आरोपींना आज जिल्हा न्यायालयात सुनावली.

प्रस्तुत केसमधील सरकारी वकील म्हणून अॅड. श्री. प्रफूल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले. तसेच सदर गुन्हयाचा तपास पो.उ.नि. दिलीप जाधव यांनी केला व पो.हे.कॉ.श्री.प्रदीप भंडारी यांनी सरकार पक्षास मदत केली. महिलेनेच, महिलेविरूध्द केलेल्या गुन्हयामध्ये सुध्दा न्यायालयासमोर सबळ पुरावा आल्यास शिक्षा दिली जाते. याबाबत अभिप्राय सरकारी वकिल यांनी व्यक्त केला.

Post Views: 57
Previous Post

मुंबईत एअर मिसाईल, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

Next Post

मराठा आरक्षणाचा सुधारित अध्यादेश जारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठा आरक्षणाचा सुधारित अध्यादेश जारी

मराठा आरक्षणाचा सुधारित अध्यादेश जारी

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी उधना ते मिरज दरम्यान 4 अतिरिक्त रेल्वे धावणार

July 7, 2026

लांबोटी येथे चेष्टा मस्करीत मारहाण झालेल्या बिहारच्या तरुणाचा  मृत्यू 

July 7, 2026

नू. म. वि. शिशु शाळेत ‘शिशु शाळा विचार मंच’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

July 7, 2026

सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेने सोलापुरात शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात

July 7, 2026
एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

एस शटलर बॅडमिंटन अकादमी’ची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026

उच्च शिक्षण विभागाचा अजब कारभार; वेतन सातव्या, तर रजा रोखीकरण सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे

July 7, 2026
लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी कन्यां’कडून मोरवंची येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणि जैविक खतांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी कन्यां’कडून मोरवंची येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया आणि जैविक खतांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

July 7, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेत जाधववाडीच्या रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0963812

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!