सोलापूर : मूलबाळ होत नाहीत म्हणून व माहेरून ४० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मुंबई येथील पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रतिमा नितीन कुंटे (वय ३३, रा. ५५०, दक्षिण कसबा, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन आनंद कुंटे (पती), शोभा कुंटे (सासू), आनंद कुंटे (सासरे , सर्व राहणार परेल मुंबई), रेश्मा हेंद्रे (नणंद), सिद्धेश हेंद्रे (नणंदेचा पती), राजेंद्र कुंटे (चुलत सासरे) आणि जया कुंटे (चुलत सासू) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
यातील फिर्यादी प्रतिमा कुंटे यांचे लग्न २७ डिसेंबर २०१० रोजी झाले. लग्नानंतर सुमारे चार वर्षांनी ते ८ जून २०२६ पर्यंतच्या काळात त्यांना विविध कारणांवरून त्रास देण्यात आला. फिर्यादीला मुल बाळ होत म्हणून तिला घटस्फोट देऊन पतीला दुसरे लग्न करण्यास सांगणे, पत्नीवर पैसे खर्च करू नये, घर खाली करून देण्यास सांगणे तसेच माहेरून ४० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करण्यात आली. लग्नात केवळ २५ हजार रुपये हुंडा मिळाल्याचे सांगून ४० लाख रुपये आणले नाहीत तर घराबाहेर काढण्याची धमकी देण्यात आली.
तसेच माहेरच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मागून घेण्यास सांगत शिवीगाळ, मानसिक व शारीरिक त्रास देऊन हाताबुक्क्याने मारहाण करून जाचहाट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आरेनवरू हे करीत आहेत.
Post Views: 5