श्रीपूर येथिल शहिद निवृत्ती जाधव बहुउद्ददेश्य संस्था व चंद्रशेखर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवृत्ती जाधव यांच्या स्मृती दिनी आयोजित कार्यक्रमात मानवंदना देताना ते बोलत होते .
यावेळी कार्यकमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिन्दे होते .
प्रथम शहीद निवृत्ती जाधव यांच्या पुतळ्यास रणजितसिंह शिन्दे , पोलिस निरिक्षक निरज उबाळे , पोलिस उपनिरिक्षक करिश्मा वगरे , महाळुंग – श्रीपूर नगर पंचायतीचे गटनेते राहूल रेडे – पाटील , उपनगराध्यक्ष तानाजी भगत , नगसेवक सोमनाथ मुंडफणे , प्रकाश नवगिरे , विक्रमसिंह लाटे , रावसाहेब सावंत – पाटील, मौला पठाण , अमर पिसाळ – देशमुख , ब्रिमा सागर डिस्टलरीचे डेप्यु . मॅनेजर नरेश पाठक , महाळुंगचे मंडल अधिकारी शरद खंडागळे , तलाठी निहाल जाधव , चंद्रशेखर विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे , मुख्याध्यापक शंकर यादव शहीद निवृत्ती जाधव यांच्या पत्नी सुरेखा जाधव , नगरसेविका तेजश्री लाटे यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली .
यानंतर झालेल्या कार्यक्रमात शासकिय सेवेत उत्तम काम करत असलेल्या पोलिस उपनिरिक्षक करिष्मा वनगे यांचा तसेच महाळुंग चे मंडल अधिकारी शरद खंडागळे यांचा सर्वोत्कृष्ठ सेवेच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला याबरोबरच अभ्यासिकेचे भूमिपूजन व वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी मानले .





















