पंढरपूर – राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली आहे. मात्र हीकर्जमाफी लागू करण्यासाठी जाचक नियम व अटी घातल्या आहेत. यामुळे यातून अनेक शेतकऱ्यांनावगळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने सरसकट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा द्यावा यामागणीसाठी आमदार रोहित पवार १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणारआहेत.
पंढरपूरचा विठ्ठल हा शेतकरी तसेच कष्टकरी, दिनदुबळ्या समाजातील लोकांचे दैवत आहे. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी समाजातीललोकांच्या मागण्यासाठी राज्यातील कोणतेही आंदोलन श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरपुरातून सुरू करण्याचीपूर्वापार प्रथा आहे. त्यामुळेच आज पर्यंत येथून जी जी आंदोलने केली गेली त्या सर्वआंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या अगोदरही सर्व आंदोलने पंढरपुरातून सुरू केली होती. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले यशमिळाले असल्याचे दिसून आले होते. विठ्ठल हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा देव आहे. यामुळे विठ्ठलाच्यादर्शनाला शेतकरी येतात म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी विठ्ठलासमोर मांडून त्या सोडवूनघेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथून अन्नत्याग आंदोलन १२ जून पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आमदार रोहित पवार १
२ जून रोजी पंढरपूरयेथे येणार असून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर ते नगरप्रदक्षिणा करणार आहेत. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून येथील शिवतीर्थावर अन्नत्याग आंदोलन करण्यास सुरुवात करणारआहेत. दरम्यान राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. मात्र ही कर्जमाफी करताना जाचक नियम व अटी घालण्यात आल्या आहेत.यामुळे याचा लाभ ५०% हून अधिक शेतकऱ्यांना मिळणारनाही. त्यामुळे सर्वचशेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार पंढरपुरातून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
—————-
चौकट : ( पिकविमा योजना पुन्हा सुरु करावी )
सरसकट कर्जमाफी बरोबरच केंद्र
व राज्य शासनाने बंद केलेली एक रुपया मध्ये मिळणारी पीकविमा ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी देखीलआमदार रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलनाच्यानिमित्ताने लावून धरणार आहेत.
–महेश भंडारकवठेकर ०७-०६-२०२६-
Post Views: 22