Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मॉडेल रायफल शूटिंग अकॅडमी बंद, सोलापूरच्या खेळाडूंचे भविष्य अंधारात

तरुण भारतbyतरुण भारत
August 12, 2026
in sports
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​सोलापूर – ​गेल्या १३ वर्षांपासून अविरतपणे गुणवान रायफल शूटर खेळाडू घडवणारी आणि सोलापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारी येथील इंडियन मॉडेल स्कूल मध्ये सुरू असणारी ‘मॉडेल रायफल शूटिंग अकॅडमी’ अचानक बंद करण्यात आली आहे. रेंज शिफ्टिंगमुळे ही शूटिंग रेंज गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने ३० हून अधिक प्रतिभावान खेळाडूंच्या सरावासमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

 

या रेंजमध्ये राष्ट्रीय आणि इंडिया ट्रायल देणाऱ्या खेळाडूंसह जवळपास ३० खेळाडू दररोज नियमित सराव करत होते. सध्या नॅशनल ट्रायल आणि शालेय स्पर्धा तोंडावर असताना रेंज बंद असल्याने आणि ती कधी सुरू होणार याबाबत खेळाडू व पालक वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

——-

​अकॅडमीची गौरवशाली परंपरा

अविनाश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या अकॅडमीने आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवले आहेत. विशेष म्हणजे, विश्वचषक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू पार्थ राकेश माने याने याच शूटिंग रेंजवरून बंदूक धरण्याचे प्राथमिक धडे गिरवत आपल्या यशाची सुरुवात केली होती. गेल्याच वर्षी येथील खेळाडूंनी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदक पटकावले. सोलापूर विद्यापीठाच्या इतिहासात शूटिंग स्पर्धेत ऑल इंडिया स्पर्धेत टॉप ८ मध्ये स्थान मिळवणे आणि त्या माध्यमातून ‘खेलो इंडिया’साठी निवड होणे, असे उल्लेखनीय यश या अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवून दिले आहे.

——–

अतिशय खर्चिक खेळ

​शूटिंग हा अतिशय खर्चिक खेळ आहे. एका खेळाडूची रायफल अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांना येते, तर शूटिंगसाठी लागणाऱ्या विशेष ड्रेसची किंमत ५० ते ७५ हजार रुपयांच्या घरात असते. तसेच, एक खेळाडू सरासरी महिन्याला ५ ते ६ हजार रुपयांच्या गोळ्या (अॅम्युनिशिन) सरावावर खर्च करत असतो. पालकांचा हा लाखो रुपयांचा खर्च आणि खेळाडूंची मेहनत ऐन महत्त्वाच्या स्पर्धांच्या तोंडावर वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

—-

इनडोअर हॉल उपलब्ध करून द्यावा

​सोलापुरातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांनी किंवा प्रशासनाने पुढे येऊन या अकॅडमीसाठी तातडीने ४० बाय ५०चा इनडोअर हॉल उपलब्ध करून द्यावा, अशी आर्त हाक खेळाडू आणि पालकांकडून दिली जात आहे. योग्य जागा मिळाल्यास ही हक्काची शूटिंग रेंज पुन्हा सुरू होईल आणि खेळाडूंचा सराव पूर्ववत होऊ शकेल.

—–

​अकॅडमीतून घडलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू:

​या अकॅडमीच्या माध्यमातून सोलापूरचे नाव देशपातळीवर पोहोचवणारे प्रमुख खेळाडू याप्रमाणे:आंतरराष्ट्रीय: ​पार्थ माने. राष्ट्रीय : ​रोहित गायकवाड,​ ओंकार घोडके, ​वैष्णवी गायकवाड, ​सुयोग गायकवाड, ​कृष्णा  बनसोडे, ​आदिती चोपडे, ​अवंतिका  नारायणकर, ​जागृती चाकोते, ​शुभम क्षीरसागर, ​अलीशा पुरी,​श्रद्धा दिवटे,​त्वरिता खटके, ​कैलास शिवशरण.

Post Views: 37
Previous Post

​गुजमील कमलीवाले, ​डॉ. चंदाराणी क्षीरसागर यांना सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

Next Post

विद्यार्थ्यानी व्यावसायिक शिक्षण अवगत करावे – वाय डी  वाघमारे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विद्यार्थ्यानी व्यावसायिक शिक्षण अवगत करावे – वाय डी  वाघमारे

विद्यार्थ्यानी व्यावसायिक शिक्षण अवगत करावे - वाय डी  वाघमारे

ताज्या बातम्या

आईने तीन मुलांसह मारली किल्ल्यावरून उडी #viral #news

September 4, 2026

महाप्रसाद भंडारा लंगर इफ्तार पार्टी लग्नाच्या पंगतील आहे आता एफडीए ची परवानगी हवी #marathinews #news

September 4, 2026

दारूचे दुकान बंद करा म्हणत पुढे आल्या महिला #solapurnews #viral

September 4, 2026

मिळकतकर भरण्यास २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ #solapurnews #news

September 4, 2026

आता तालुक्यात मॉडर्न शाळा व आदर्श शाळाची उभारणी #marathinews #solapurnews

September 4, 2026

नालेसफाई घोटाळ्यातील १९ जणांनी दिले उत्तर #solapurnews #viral

September 4, 2026

डीजे मुक्ती बाबत हे म्हणाले आयुक्त…… #viral #solapurnews #aajsolapur #news

September 4, 2026
गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

September 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162418

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!