महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक शिक्षणतज्ञ वाय डी वाघमारे यांनी दिनांक 9 8 2026 रोजी धाराशिव येथील पीपल्स कॉलेज धाराशिव येथे भेट दिली याप्रसंगी वाय डी वाघमारे व प्रा डॉ सारीपुत्र तुपेरे यांचा पीपल्स कॉलेज धाराशिवच्या वतीने प्रा. डॉ. रवि सुरवसे, शाल ,पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला मनोगत व्यक्त करताना वाय डी वाघमारे म्हणाले की सध्याच्या काळात विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षण अवगत केलं पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील व विद्यार्थी लवकर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये बदल करून स्पर्धेच्या अत्याधुनिक युगामध्ये जे जे आव्हाने समोर येतील त्याला धाडसाने सातत्य , चिकाटी व सतत प्रयत्न केल्यास निश्चितपणे विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठता येईल याप्रसंगी प्रा डॉ रवी सुरवसे प्रा अंबादास कलासरे प्रा महेंद्र चंदनशिवे व्ही एस गायकवाड इत्यादींची उपस्थिती होती.






















