Wednesday, November 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

तरुण भारतbyतरुण भारत
July 30, 2026
in marathwada
0
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, दि. २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयानंतर अवघ्या २४ तासांत विकास प्रक्रियेला प्रत्यक्ष गती मिळाली आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ३०) म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची तयारी करून तो शासनाकडे तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.या बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे इतर अधिकारी सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपस्थित होते.
आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटचा विकास आराखडा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय दि. २९ जुलै, गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला.
या निर्णयानंतर अवघ्या एकाच दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर आणि भाविकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उभारण्याचा सविस्तर आराखडा तयार करून पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच, दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण, विस्तारीकरण आणि भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा विकास आराखडाही राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अक्कलकोटमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता, पायाभूत सुविधा, धार्मिक पर्यटन आणि परिसराच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना प्रारंभ करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया
“महायुती सरकारने अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले, ही अक्कलकोटसाठी ऐतिहासिक बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे श्री स्वामी समर्थ नगरीचा विकास नव्या उंचीवर पोहोचेल. त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”
सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट
Post Views: 236
Previous Post

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

Next Post

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

ताज्या बातम्या

#breakingnews #solapurbreaking #solapurnews #fire #fireaccident #dangerous

November 4, 2026

नवीवेस पोलीस चौकी समोर कचरा कुंडीला लागली आग

November 4, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत१० उमेदवारांचे अर्ज बाद..

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

November 3, 2026
५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

November 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1464234

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!