सोलापूर : पवित्र श्रावण मासानिमित्त विमानतळाच्या मागील श्री बसवारूढ मठात महिनाभर श्री वृत्तीरत्नावली ग्रंथावर विवेचन मांडण्यात येणार आहे, अशी माहिती मठाचे मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी दिली.
श्रावण मासानिमित्त श्रो. ब्र. श्री जडिसिद्धेश्वर स्वामीजी भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. १३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत श्री वृत्तीरत्नावली या ग्रंथावर भाष्य करून विवेचन मांडणार आहेत. या उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष आहे. त्याचबरोबर सिद्धारूढ चरित्रामृत या ग्रंथावर दररोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी मार्गदर्शन करणार आहेत. मुमुक्षु वृंदांनी तसेच साधकांनी या विवेचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बसवारूढ मठातर्फे करण्यात आले आहे.






















