सोलापूर : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान तसेच एनसीसी विभागात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आनंदी गोर बंजारा समाज ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी प्रशाला, सोलापूर येथील सहशिक्षिका तथा एनसीसी ऑफिसर सौ. आशा संजय राठोड यांना ‘गोर बंजारा समाज सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्माननीय नगरसेविका सौ. अश्विनीताई चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सौ. आशा राठोड यांनी, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कार रुजविण्यासाठी भविष्यातही अधिक समर्पितपणे कार्य करत राहीन, अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमास विजयकुमार राठोड, प्रेमसिंग राठोड, शिवाजी राठोड, हिराचंद राठोड, थावरू राठोड, सुभाष चव्हाण, भोजराज पवार, निलकंठ जाधव तसेच प्रा. संजय राठोड यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 13