Thursday, May 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काम न करताच ठेकेदाराने लाटली बिले!

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in west maharashtra
0
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काम न करताच ठेकेदाराने लाटली बिले!
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पिलीव – ​संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या (९६५ G) कामात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम पूर्ण न करताच कागदोपत्री काम झाल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
​
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या आषाढी वारीची लगबग सुरू असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या महामार्गाचे काम निकृष्ट आणि अपूर्ण असतानाही ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून पैसे उचलले आहेत.
​तरंगवाडी (वेताळबाबा मंदिर): येथे ७०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचे दाखवून पैसे लाटले आहेत, मात्र प्रत्यक्ष काम झालेले नाही. या रस्त्यामुळे अनेक अपघातांत नागरिकांना जीव गमवावा लागला असून, शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
​शेळगाव ब्रिज येथील पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे दाखवून त्याचे पूर्ण पेमेंट उचलण्यात आले आहे.
​इंदापूर (पुणे-सोलापूर हायवे) बारामती चौक येथील १६०० मीटर रस्त्याचे काम न करताच ठेकेदाराने पैसे काढले आहेत.
​अशा अनेक ठिकाणी सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचे काम कागदोपत्री दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
​
या भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांवर दोन दिवसांच्या आत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कडक कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संबंधित कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
​यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
​”जर दोन दिवसांत या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळाला नाही, तर दोषी अधिकाऱ्यांना काळे फासले जाईल आणि यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”
– अजित बोरकर, तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Post Views: 11
Previous Post

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातून जीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

Next Post

मुंबईत तीन दिवसीय ‘आक्रोश’ आंदोलनाची हाक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुंबईत तीन दिवसीय ‘आक्रोश’ आंदोलनाची हाक

ताज्या बातम्या

विश्वास’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; अक्कलकोटमध्ये ८.४६ लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त

विश्वास’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; अक्कलकोटमध्ये ८.४६ लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त

May 28, 2026

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पावसाळ्यात पुन्हा वनवास

May 28, 2026
रोटरीच्या मोफत आरोग्य शिबिरात ५६ नागरिकांची आरोग्य तपासणी

रोटरीच्या मोफत आरोग्य शिबिरात ५६ नागरिकांची आरोग्य तपासणी

May 28, 2026
राम गडकरी यांच्या जयंतीनिमित्त नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने अभिवादन

राम गडकरी यांच्या जयंतीनिमित्त नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने अभिवादन

May 28, 2026
पवित्र पोर्टल भरतीला ‘ब्रेक’, पण उमेदवारांसाठी संधी वाढणार?

पवित्र पोर्टल भरतीला ‘ब्रेक’, पण उमेदवारांसाठी संधी वाढणार?

May 28, 2026
पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचे निवेदन

पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचे निवेदन

May 28, 2026
अहिल्यादेवींनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

अहिल्यादेवींनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

May 28, 2026

जि.प अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची झाडाझडती

May 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0882869

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697