Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पर्यावरणस्नेही बसेसमुळे सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतbyतरुण भारत
October 29, 2025
in mumbai
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई  : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वे, मेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री  फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव , मुख्य अभियंता राजन गंदेवार, मुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी  ‘सिंगल तिकीट सिस्टीम’ आणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न  जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावे, अधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. ‘बेस्ट’ सक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेच, असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

कर्मचारी आनंदी तर प्रवासी सेवा अधिक कार्यक्षम

‘बेस्ट’ साठी प्रवासी सुविधा वाढवितानाच व कर्मचारी हिताचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतील योगदान, कोविड काळातील लाभाच्या निधीची रक्कम देण्यात आली आहेत. याचबरोबर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याइतकाच बोनस ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. कर्मचारी आनंदी असतील तर ही प्रवासी सेवा अधिक चांगली कार्यक्षम राहील, असे  मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबईकरांसाठी  ‘बेस्ट’आणि लोकल रेल्वे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नागरिकांना चांगला प्रवास मिळावा यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये निधी तरतूद केली आहे. एकेकाळी ट्राम व  बग्गी धावलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांवर आता या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस धावणार आहे, प्रवासाचे हे नवीन पर्व सुरू आहे. ताफ्यात समाविष्ट झालेल्यामध्ये नियमित लांब बसेसबरोबर मिडी बसेस देखील आहेत. ज्या वर्दळीच्या रस्त्यावर सहजगतीने मार्गक्रमण करतील.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक नागरिक येत असतात,  शहरातील सुविधा वाढविण्यासाठी लक्ष दिले जात आहे.

शासनाच्या कामाचा झपाटा मोठा असून शहराला कोस्टल रोड, अटल सेतू , मेट्रो यासह  काँक्रीट रस्ते, पूल अशा जलद आणि उत्तम दळणवळण सुविधा देण्यात येत आहेत. असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना दिवाळीपूर्वीच बेस्ट कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस दिला आहे. शासन कर्मचाऱ्यांसाठी हिताचे काम करते असून मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सफाई कर्मचारी अविश्रांत काम करीत असतात, ते खरे मुंबईचे हिरो आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी देखील निर्णय घेतले आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणारी योजना लागू केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

ओशिवरा, गोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण

कुलाबा आगारासह ओशिवरा, गोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे  देखील लोकार्पण करण्यात आले.  यामुळे सुमारे 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज दर्जेदार प्रवास अनुभवता येईल.

मुख्यमंत्री यांच्या समवेत मान्यवरांनी क्रमांक 4068 वीर कोतवाल उद्यान कुर्ला नामफलकाच्या बस मध्ये बसून पाहणी केली, माहिती घेतली व काही अंतर प्रवास केला.

बेस्ट उपक्रमात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्‌यांचे पर्व

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटन लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्‌या प्रवर्तित होत आहेत. या बसगाड्या ‘वेट लीज’ पद्धतीने चालविल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

150 इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्रा‌द्वारे नियमित देखरेख केली जाईल.

ही बससेवा अंधेरी (प.), जोगेश्वरी (प.), कुर्ला (पूर्व व पश्चिम), बांद्रा (प.), कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे.

या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यतची जोडणी उपलब्ध करून देतील.

Post Views: 45
Previous Post

माय भारत’ने पार केला दोन कोटी नोंदणीचा टप्पा

Next Post

आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करा - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822732

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697