
सोलापूर – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भव्य नामगजर सोहळा व महासत्संग कार्यक्रम दी. १४ जून २०२६, रविवार सकाळी ९ वाजता जुने विठ्ठल मंदिर, बागेवाडीकर हॉस्पिटल जवळ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सोलापूर शहर-जिल्ह्यातील भक्त-शिष्य आदि भाविकांनी उपस्थित राहून नामस्मरण, संतसंग याआध्यात्मिक सोहळ्यात सहभाग होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन रामानंदाचार्य संप्रदाय सोलापूर शहर व जिल्हा सेवा समितीकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमामध्ये महासत्संग, भव्य नामगजर सोहळा, जिल्हा कमिटी मीटिंग, महाप्रसाद, विविध स्पर्धा, बक्षीस वितरण यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी ९८३४०९६२१८, 93263 47377, 70580 70916 या नंबरवर संपर्क साधावा.





















