
सोलापूर – भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या विकासात्मक, जनकल्याणकारी व ऐतिहासिक कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आमदारांचे विशेष जनसंपर्क अभियान’ अंतर्गत शनिवारी हनुमान नगर येथे आ. विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या विकासात्मक, जनकल्याणकारी आणि ऐतिहासिक कामगिरीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविताना विविध विषयांवर संवाद साधण्यात आला. जनतेशी थेट संपर्क, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत आहे.
यावेळी नगरसेविका पुनम काशिद, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक गौतम कसबे, माजी नगरसेवक प्रभाकर काशिद, प्रेमनाथ सलगर, शंकर भिसे, विठ्ठल नवगिरे, माऊली वाघचौरे, हरी नलवडे, पोपट पवार, अजय हूच्चे, किरण जगताप, तम्मा जडगे, मल्लिनाथ जाधव, बापू अपराध, संग्राम काशिद, युर्वराज दिंडोरे, सत्यम पोरे, सुनिल गायकवाड, बाळू शिंदे आदि उपस्थित होते.




















