
एक हजार मुलांना वह्या वाटपाचा शुभारंभ
—————————————
श्री सिद्धेश्वर फाउंडेशन विविध क्षेत्रात करीत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा पुरविण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.एक हजार गरजवंत मुलामुलींना वह्या वाटप करण्याचा उपक्रम,पर्यावरण क्षेत्रातील कार्य पाहता श्री सिद्धेश्वर फाउंडेशन खऱ्या अर्थाने वचनातून आचरणाकडे या उक्तीनुसार कार्य करीत आहे असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते व युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपूरे यांनी काढले.
सोमवारी श्री सिद्धेश्वर फाउंडेशन चा गरजवंत मुलामुलींना वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ प्रातिनिधिक मुलामुलींना वह्या व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बुऱ्हाणपूरे बोलत होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जीवन चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सिद्धेश्वर फाउंडेशन चे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे यांनी प्रास्ताविकात मागील सहा वर्षांत फाउंडेशन ने ३५०० वृक्षारोपण सहित केलेल्या इतर उपक्रमांची माहिती दिली.
या कर्यक्रमात मुख्यत्वे एकल पालक व मोलमजुरी करणाऱ्या व जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना चाबुकस्वार म्हणाले की,या फाउंडेशनने नुकताच राबविलेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अविस्मरणीय असा होता. श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या भविष्यातील सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे म्हटले.यावेळी उपस्थित मान्यवरांना श्री सिद्धरामेश्वर पुराण ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
—————————————
चौकट
—————————————–
श्री सिद्धेश्वर फाउंडेशन ने उतरविला सर्पमित्रांचा ५ लाखाचा विमा
सर्पमित्र हे स्वतःचा जीव धोक्यात घालून विषारी साप पकडून समाजाला मदत करतात पण कांही वेळेस हे कार्य करीत असताना त्यांच्या जीवावर बेतत असते यासाठी श्री सिद्धेश्वर फाउंडेशन ने सोलापुरातील २१ सर्पमित्रांचा ५ लाखाचा विमा उतरविला असल्याचे सचिव डॉ.अनिल सर्जे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्र सरकारने हीच संकल्पना स्वीकारत राज्यातील सर्व सर्पमित्रांच्या विमा उतरविला आहे ही सिद्धेश्वर फाउंडेशन साठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
—————————————–
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सिद्धेश्वर फाउंडेशनचे शिक्षण विभाग तथा संपर्क प्रमुख राजेंद्र बलसुरे यांनी केले.
कार्यक्रमास विश्वनाथ आमणे, चिदानंद मुस्तारे,सचिन विभुते,बाबुराव रायगोंडे, पंढरीनाथ अग्नीकर, दिलीप बच्चुवार,गंगाधर पाटील, इरण्णा अतनुरे, सुनील कापसे आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी सुनील सर्जे,भीमसिंह रजपूत, डॅा गौरी सर्जे आदींनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांना श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने अल्पोपाहार देण्यात आला.
Post Views: 6