सोलापूर – स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने शिवस्मारक सभागृह येथे विधवा विधुर घटस्फोटीत पुनर्विवाह परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
शिवस्मारक सभागृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संभाजी ब्रिगेडच्या वतीने पहिल्यांदाच सोलापूर मध्ये विधवा विदुर घटस्फोटीत पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 57 विधवा विदुर यांनी मेळाव्यास उपस्थित राहून नोंदणी केली.
या मेळाव्यास चंद्रकांत पवार वसुंधरा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यास मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की समाजातील सर्व धर्मीय विधवा विदुर घटस्फोट अश्या एकांकी जीवन जगणारे समाजात अनेक जण आहेत त्यांना जिवन जगताना मायेचा आधार मिळावा दुसरी संधी म्हणून जीवनात योग्य जोडीदार मिळावा या उद्देशाने स्तुत्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते भविष्यात अशा प्रकारचे विवाह सोहळा मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, विक्रम वानकर, दिलीप भोसले, मराठा सेवा संघाचे रमेश जाधव, मनीषा कोळी, माधुरी चव्हाण, अंजली पवार, विशाल साळुंके, प्रशांत चौरे, मिलिंद मस्के, शिवाजी थोरात, ओंकार कदम, शिरीष जगदाळे, तात्या इंगोले आदी उपस्थित होते.
























