Wednesday, September 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अधिकमासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
May 11, 2026
in editor
0
अधिकमासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने करमाळा शहरात भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळणार असून 15 मे ते 21 मे या कालावधीत संत गजानन महाराज मंदिर एसटी कॉलनी श्रीदेवीचा माळ रोड करमाळा येथे भव्य शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्यावतीने श्रेणीक खाटेर व श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांनी दिली आहे. आदरणीय सुश्री स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर यांच्या सुमधुर व प्रभावी वाणीतून होणाऱ्या या कथा सप्ताहामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून जाणार आहे.

शुक्रवार दि. १५ मे २०२६ ते गुरुवार दि. २१ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा धार्मिक ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. करमाळ्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भगवान शंकरांचे चरित्र, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचे प्रभावी निरूपण स्नेहगंगा शृंगारे माई आळंदीकर आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून करणार आहेत. त्यामुळे सात दिवस चालणारा हा कथा सप्ताह भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत कार्यक्रम पत्रिका प्रकाशन व मंडप पूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मुख्य यजमान श्री. श्रेणिक खाटेर, सौ. संगीता खाटेर तसेच श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

बैठकीत कथा सप्ताहाचे सुयोग्य नियोजन, मंडप व्यवस्था, भक्तांसाठी सुविधा, प्रसाद वितरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. यावेळी सर्वांनी तन-मन धनाने शिवपुराण महाकथा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा मानस व्यक्त केला आहे .

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जगदीश शिगची तसेच सौ. कविता नीळ आटोळे मॅडम यांनी धार्मिक उपक्रम समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करतात, असे मत व्यक्त केले. अधिकमासाच्या पवित्र कालखंडात आयोजित कथा सप्ताहामुळे युवकांमध्ये संस्कार व समाजात ऐक्यभाव वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनेश मुथ्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री संत गजानन महाराज भक्त परिवार व समितीच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि गणपतीची मूर्ती देऊन गौरविण्यात आले. हा सत्कार मुख्य यजमान श्री. श्रेणिक खाटेर यांच्या हस्ते करण्यात आला.

या नियोजन बैठकीस श्रेणिक खाटेर रवींद्र विद्वत, जगदिश शिगची,प्रदीप देवी, नारायण पवार, सुरेश चव्हाण, कचरूशेठ मंडालेचा, अर्जुन गंधे, गणेश बोरा ,शंकर रासकर, पत्रकार दिनेश मडके, विजय साळुंखे सर, दिनेश मुथ्था,,ॲड संकेत खाटेर वर्धमान खाटेर गिरीश शहा बापू शिरगिरे वैभव दोशी यांच्यासह महिला भगिनी सौ संगिता खाटेर, सौ. स्वाती मसलेकर, सौ .कविता नीळ सौ.छाया देवकर, वैशाली कोळी, सौ रत्नमाला शिंदे, सौ कमल चव्हाण, सौ आशाबाई देशमुखे,सौ संगीता गुंड विना विद्वत, शिंदे काकू , चव्हाण आक्का,जिजी सातपुते,आडकर मॅडम,मनिषा कानडे श्रध्दा जोशी,सौ.आरती बोकन सोनु बोकन यांच्यासह भक्त परिवार, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 50
Previous Post

घटस्फोटीत पुनर्विवाह काळाची गरज – चंद्रकांत पवार

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

ताज्या बातम्या

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणरायाचे जल्लोषात स्वागत

September 15, 2026
जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

जिल्हा परिषदेचे कामकाज गुणवत्तापूर्ण करा; अभियंत्यांना सीईओ कुशल जैन यांचे आवाहन

September 15, 2026
कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

कट्टेप्पा कोळी यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान 

September 15, 2026
ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

September 15, 2026

पाेलीस आसल्याची बतावणी करून  मंगळवेढ्यात भरदिवसा दाेघांना लुटून  २ लाख .१६ हजाराचे साेने केले गायब

September 15, 2026
युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

September 15, 2026

२९ सप्टेंबरला शिवस्मारक सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा

September 15, 2026

सोलापुरात २७ सप्टेंबरला वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा

September 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1213118

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!