Thursday, October 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माढा महाविद्यालयाचा नवीन बांधकामाचा स्लॅब कोसळला… सहा कामगार जखमी, जीवित हानी नाही

तरुण भारतbyतरुण भारत
February 1, 2026
in crime
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा : शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या मल्टीपर्पज हॉलचे स्लॅब कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने याच्यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरीही पाच ते सहा कामगार जखमी झाले असून त्यातील एका कामगाराला सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की माढा शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून यामध्ये ४५x१०० फूट अंतराच्या आणि २६ फूट उंचीच्या मल्टीपर्पज हॉलचे टाकण्याचे काम सुरू होते. सकाळी दहा वाजता काम सुरू झाले होते. सायंकाळी चार वाजण्याचे सुमारास संपूर्ण स्लॅब भरत आल्यानंतर अचानक हा स्लॅप कोसळला .यावेळी चहा आल्याकारणाने चहा पिण्यासाठी कामावर असणाऱ्या २०ते २५ कामगार चहा पिण्यासाठी खाली आले होते. यामुळे पाच ते सहा कामगारच वरती होते.  हे सर्वजण सोबत खाली कोसळले .सुदैवाने मोठी जीवितहानी न होता सर्वजण जखमी झाले. सर्वांना प्राथमिक उपचारासाठी माढा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिका जयश्री आव्हाड तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली.

हा अपघात समजतात माढा शहरातील गणेश साळुंखे , विशाल कानगे, सचिन बनसोडे ,भोला पाचंगे, नागनाथ मारकड आदी सह इतर तरुणांनी घटनास्थळी धाव घेत स्लॅब मध्ये अडकलेल्या संबंधित कामगारांना बाहेर काढत रुग्णालयात पोहोचवले.यावेळी प्रा शिवाजीराव सावंत यांचे सह माढा शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून धीर दिला.

यापैकी ठेकेदार संभाजी बागल यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

चौकट…..

 केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारती अंतर्गत आय के एस मल्टीपर्पज हॉल बांधकाम सुरू आहे. आज याचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते .हे काम सुरज लोंढे आणि संभाजी बागल या ठेकेदारांना दिले आहे .स्लॅब चे काम पूर्ण होत असतानाच अंतिम क्षणी हा स्लॅब कोसळला. या पाठीमागे स्लॅबच्या खाली दिलेला आधार कमी पडला असावा असा अंदाज असून महाविद्यालयाकडून संबंधित व्यक्तींना ठेका दिलेला आहे .या कामासह नुकसानीची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे.

….. 

प्रा. घनश्याम हराळे प्रभारी प्राचार्य माढा महाविद्यालय.

Post Views: 97
Previous Post

महाराष्ट्राची पाँडिचेरीवर 156 धावांची आघाडी; दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 8 बाद 336 धावा

Next Post

मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज- न्यायाधीश ए.ए.पाटील 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज- न्यायाधीश ए.ए.पाटील 

ताज्या बातम्या

एसबीआय  म्युच्युअल फंडाला ग्राहक मंचाचा दणका

October 1, 2026
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

October 1, 2026
लोकसेवा विद्यालयाच्या असफ मुजावरची जिल्हास्तरीय कुस्तीत चमकदार कामगिरी

लोकसेवा विद्यालयाच्या असफ मुजावरची जिल्हास्तरीय कुस्तीत चमकदार कामगिरी

October 1, 2026

चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग

October 1, 2026

‘AI आणि माध्यमांची भूमिका’ विषयावर सोलापूर विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

October 1, 2026

पिलीव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

October 1, 2026
मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

October 1, 2026
चोरीचा ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक!

चोरीचा ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक!

October 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1287416

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!