Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्राची पाँडिचेरीवर 156 धावांची आघाडी; दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 8 बाद 336 धावा

तरुण भारतbyतरुण भारत
February 1, 2026
in sports
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध पाँडिचेरी या क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात 95 षटकात 8 बाद 336 धावा केल्या असून पॉंडिचेरी संघावर 156 धावांची आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात  कालची नाबाद जोडी हर्ष मोगावीरा व कप्तान सचिन धस यांनी खेळ पुढे सुरू ठेवत 49 धावांची भागीदारी रचली. 60 धावा झाल्या असताना आकाश पी. याने हर्ष (27)ला शिशिरकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या दिग्विजय पाटील सोबत सचिन धसने उपयुक्त फलंदाजी करत स्वतःचे सलग दुसरे अर्धशतक झळकावले. दोघात 59 धावांची भागीदारी झालेली असताना सचिन (54) नमन शर्माद्वारे त्रिफळा बाद झाला. जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 161/3 (39 षटके) अशी धावसंख्या झालेली. 

किरण चोरमले सोबत दिग्विजयने दमदार फलंदाजी करत 53 धावांची भागीदारी रचत अर्धशतक लगावले. किरण चोरमले (16) देखील नमन शर्माद्वारे त्रिफळाबाद झाला. त्यानंतर आलेल्या अभिषेक पवार सोबत दिग्विजयने 44 धावांची भागीदारी रचली. नमन शर्माने पृथ्वी खन्ना द्वारे अभिषेक (10) ला झेल बाद केले. त्यानंतर आलेल्या अजय बोरुडे सोबत प्रभावी फलंदाजी करत दिग्विजयने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकाविले. चहापानाला काहीच वेळ शिल्लक असताना दिग्विजय (110 धावा, 145 चेंडू, 17 चौकार, 1 षटकार) शिशिरद्वारे पायचीत झाला.

तिसऱ्या सत्रात अजय बोरुडे  स्वराज चव्हाण सोबत संथ फलंदाजी करत असताना कप्तान नितीन प्रणवने स्वराज (14)ला कारथीराजाद्वारे झेलबाद केले व त्यानंतर आलेला शुभम मेड (8) नमन शर्माचा 5वा बळी ठरला तो आकाश पी.द्वारे झेलबाद झाल्याने. तळातील खेळाडू वैभव दारकुंडे सोबत अजय बोरुडेने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत दिवस अखेर धावसंख्या 300 पार नेली. दिवसातील 90 षटके पूर्ण झाल्यावर पंचांनी खेळ थांबविला तेव्हा 8 बाद 336 धावा करत महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतली असून उद्या पहिल्या सत्रात शेवटचे 2 खेळाडू आणखीन किती धावा जोडून आघाडी वाढवितात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नमन शर्माला गोलंदाजी मध्ये साथ देत नितीन प्रणव, आकाश पी, शिशिर एच आर.यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

——

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांकडून तसेच सामन्यातील पंच, गुणलेखक, अधिकारी यांचे वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दंडावरती काळी फीत लावून दिवसभर खेळ केला. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने विविध समित्या या सामन्यासाठी कार्यरत असून सर्वांचे कडून अतिशय उत्तम नियोजन केले असल्याचे पाहुण्या पांडिचेरी संघाचे व्यवस्थापक श्री.रामदासी यांनी सांगितले.

Post Views: 70
Previous Post

जि.प व पं.स निवडणूकीसाठी सांगोल्यात दुसरे प्रशिक्षण संपन्न

Next Post

माढा महाविद्यालयाचा नवीन बांधकामाचा स्लॅब कोसळला… सहा कामगार जखमी, जीवित हानी नाही

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माढा महाविद्यालयाचा नवीन बांधकामाचा स्लॅब कोसळला... सहा कामगार जखमी, जीवित हानी नाही

ताज्या बातम्या

शहराच्या विकासावर जिल्हाधिकाऱ्यांचा पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप

August 7, 2026

गुंगी गुडिया वक्तव्यावर बोलल्या सौ फडणवीस #viral

August 7, 2026

जरांगे पाटलांबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री #viral

August 7, 2026

अमित शहांनी राहुल गांधीच्या परदेशी वाऱ्याची कुंडलीच मांडली #viral

August 7, 2026

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव

August 7, 2026

आ.देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूरचा साडीचा पारंपारिक वस्त्रोद्योगात समावेश

August 7, 2026

राज्यभरात बाईक टॅक्सी विरोधात वाहतूक संघटनेचे निवेदन

August 7, 2026

विडी कामगाराचा जल्लोष किमान वेतन हक्क समितीच्या लढ्याला मिळाले यश

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033189

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!