
सोलापूर : ‘पद्मशाली सखी संघम’ या सामाजिक संस्थेमध्ये दरवर्षी नवीन पदाधिकारी व सदस्य निवडले जातात. यंदा २०२६ – २७ या एक वर्षांकरिता निवडले जाणार आहेत. सोलापूर शहरात स्थायिक असलेल्या पद्मशाली समाजातील इच्छुक महिलांनी तसेच सखी संघमच्या जुने सदस्या व पदाधिकाऱ्यांनी ‘रविवार २९ जून ते शुक्रवार, १० जुलै पर्यंत नांवनोंदणी’ करण्यासाठी सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या 9021551431 या मोबाईल क्रमांकाच्या व्हाटसॲपवर पूर्ण नाव व पत्ता लिहून पाठवावेत.
‘पद्मशाली सखी संघम’ स्थापन करुन यंदा पाच वर्षे होत आहे, यशस्वी पाचवे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध अभिनव सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.
चौकट
‘सदस्या’ होण्यासाठी कुठलेही फी आकारली जात नाही. ही एकमेव संस्था असून या माध्यमातून पद्मशाली समाजातील महिलांना प्रोत्साहन देऊन एकत्र करण्याचे उद्देश असल्याचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले.






















