
सोलापूर – हरीपाठ परीवाराच्या वतिने 353व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन कोकण कडा मित्र मंडळ रायगड व रायगड प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या सेवेसाठी बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर महिला पन्नास मुली व 50 पुरुष मिळून सर्वांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
निसर्ग वाचवा, पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी कशा पद्धतीने जपून वापरले पाहिजे याचा संदेश गायनाच्या माध्यमातून करण्यात आला. हा कार्यक्रम करण्यासाठी रोहित पवार अध्यक्ष कोकणकडा मित्र मंडळ रायगड, रायगड प्रतिष्ठान सोलापुर अध्यक्ष शिवाजी भोसले तसेच हरिभक्तिपरायण सुधाकर इंगळे महाराज यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी हरिपाठ परिवार शाखा निराळे वस्ती, डुमणे नगर बाळे, संत गोरोबा महिला भजनी मंडळ लष्कर, स्वागत नगर, या ठिकाणाहून सर्व भाविक गोळा झाले. या कार्यक्रमांमध्ये राजनंदिनी जांभळे, अंजली लोखंडे, तनवी गोसावी अश्विनी जांभळे,ललिता टाकळीकर,सुनिता गाढवे यांनी सुंदर गायन केले. राजवीर जांभळे, समर्थ कांबळे, श्रीपाद सोनके, अथर्व कोकरे यांनी सुंदर मृदंगाची साथ दिली.
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी तुकाराम लोखंडे, अनिकेत जांभळे, गुरुनाथ ताटे, भाऊ भागवत, अविराज जांभळे, सुनील दाते यांनी परिश्रम घेतले.






















