माढा : सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन(ताना) साठे तर उपाध्यक्षपदी डॉ रईस मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या निवडीबद्दल माढा शहरातून ,सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
जिल्हा परिषद सोलापूर च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एकमेव अशा माध्यमिक प्रशालेची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यासाठी नुकतीच पालक सभा पार पडली. मोठ्या संख्येने याप्रसंगी पालक उपस्थित होते. इयत्ता पाचवी पासून आठवीपर्यंतच्या सर्व वर्गांना प्रतिनिधित्व देत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व समाज घटकांना प्राधान्य देत या निवडी बिनविरोध पार पडल्या.
प्रारंभी मुख्याध्यापक तथा समितीचे सचिव नागेश खेडकर यांनी प्रशालेच्या गुणवत्तेविषयी याचबरोबर प्रशालेच्या अडचणींच्या बाबत विवेचन करतानाच व्यवस्थापन समितीची नियमावली आणि जबाबदारी या गोष्टींच्या अनुषंगाने उपस्थित पालकांना संबोधित केले.
माढा नगरीच्या नगराध्यक्षा तथा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मिनलताई साठे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष धैर्यशील भांगे, उपाध्यक्षा माधुरी साठे ,मुख्याध्यापक नागेश खेडकर, सदस्य भैय्या खरात,प्रवीण पवार ,किरण पवार सुरवसे ताई यांचेसह सर्व शिक्षक आणि पालक वर्ग उपस्थित होते.
नगराध्यक्ष मिनलताई साठे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतानाच सहकार महर्षी गणपतराव साठे यांनी निर्माण केलेल्या या प्रशालेची शिक्षण, क्रीडा, स्पर्धा परीक्षा या विविध क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखण्याचे आवाहन केले.. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती,व पालक यांच्यामध्ये योग्य समन्वय राखत प्रशालेचा नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन ताना साठे यांनी प्रशालेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीची नूतन समिती पुढील प्रमाणे
नितीन (ताना) साठे( अध्यक्ष)
डाॅ रईस मुल्ला (उपाध्यक्ष)
रूपाली मोरे, रेखा रोटे, उज्वला टिंगरे, स्वाती पवार, भाग्यश्री वाघमारे ,जरीना मुलानी, महेश भांगे ,प्रदीप राऊत, कविता पवार, धैर्यशील भांगे.


























