सोलापूर – गो सन्मान अभियान तहसीलदार यांना सर्व गोभक्त गोरक्षक व गोपालकांकडून दक्षिण सोलापूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गोमातेला राष्ट्रमाता दर्जा देणे, गोमातेचे कत्तल शंभर टक्के थांबविणे याबाबत कायदा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख रोहित तापडिया, शिवानंद कल्लूरकर, सहप्रमुख परदेशी, साधू संत मंडळी, आरएसएस, विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकारी, श्रीराम सेनेचे पदाधिकारी, सकल हिंदू समाज व गोमातेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे महेश भंडारी , केतन शहा, गोपाल सोमाणी, सुधीर बहिरवडे, विजय यादव, शुभम साठे आदी गोरक्षक ,दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गोशाळेचे पदाधिकारी विशेष करून गोशाळा महासंघ सोलापूर जिल्ह्याचे सचिवा श्री कट्टेव्वा देवी गोशाळेचे अध्यक्षा उमा बिराजदार, कविता राठोड, महानंदा बिराजदार, वैशाली कुलकर्णी आदी गोभक्त उपस्थित होते .


























