वेळापूर – नगरीचे आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वर यात्रेनिमित्त यात्रा कमिटी, वेळापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गजी ढोल स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडल्या. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेमध्ये एकूण दहा ढोल संघांनी सहभाग नोंदवत आपल्या दमदार तालांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झालेल्या या स्पर्धेमुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली. स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ आडत, सुरेश पिसे, धनंजय माने देशमुख, मिलिंद सरतापे, दीपक राऊत, महादेव मेहत्रे, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. विठ्ठल मंडले, उपाध्यक्ष रणजीत साठे, कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सरचिटणीस विनायक भगत, सचिव अभिजीत साठे, सेक्रेटरी विजय पवार तसेच सदस्य मनोहर माने, चंद्रकांत बनकर, शंकर आडत, बाळासाहेब आडत, वसंत आडत आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेचे समालोचन दीपकआबा राऊत यांनी प्रभावीपणे करत कार्यक्रमात रंगत आणली. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या गजी ढोल स्पर्धेमुळे वेळापूर नगरीत भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.


















