पुणे – भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे मोतीबाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित “रक्तदान शिबिरास” उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यंदाचे रक्तदान शिबिर घेण्याचे हे चौथे वर्ष आहे.रक्तदानशिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमी चे संचालक महेश पाटील यांचे हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यांनी आपल्या भाषणात,”डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी व संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे त्यांचे कार्य व त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंतआवश्यक आहे.त्यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज असल्याचे यावेळी प्रतिपादन केले.प्रत्येकाच्या जीवनात अनेक आव्हाने येत असतात त्यासाठी शिक्षणाचे महत्व खूप मोठे आहे.”
या प्रसंगी युनिक एअर एक्स्प्रेस इंटरनॅशनल कुरिअर व रिअल इस्टेट मधील प्रथितयश व्यावसायिक योगेश शिंदे यांची मुख्य उपस्थिती होती.याप्रसंगी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ रमेश कांबळे,डॉ पल्लवी गायकवाड,डॉ अतुल कुलकर्णी,जनसंपर्क अधिकारी संतोष अनगोलकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचिन भोसले ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कार्यवाह प्रसाद खेडकर यांनी करून दिला.अध्यक्ष राजीव जोशी यांनी महेश पाटील यांचा तर बाजीराव मणेरे यांनी योगेश शिंदे यांचा भारतमातेची प्रतिमा,डॉ हेडगेवार यांचे जीवन चरित्र पुस्तक देऊन सत्कार केला.”रक्ताला पर्याय नसून ते कृत्रिमरीत्या तयार होऊ शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करणे आवश्यक आहे,असे रक्तदान शिबिरे आयोजित केल्याने सामाजिक जाणिवेची अनुभूती येते” असे अध्यक्ष राजीव जोशी यांनी संस्थेची माहिती देतांना सांगितले.
या शिबिरामध्ये एकूण *शंभर* रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिरास जनकल्याण रक्तपेढी चे सहकार्य लाभले.सर्व रक्तदात्यांना संस्थेतर्फे व जनकल्याण रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र,पंच परिवर्तन पुस्तिका,भारतमातेची प्रतिमा देण्यात आली.
MPSC स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मयूर यादव उपशिक्षणाधिकारी,अमित लोकरे उपजिल्हाधिकारी,योगेश घुले कक्ष अधिकारी,वैभव ढेरंगे STI, सचिन तनपुरे PSI यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे किरण गांधी,उदय पंचपोर,राजेंद्र वालेकर,बाजीराव मणेरे,प्रकाश आठवले,प्रा सागर दरेकर तसेच जनकल्याण रक्तपेढीचे संतोष नखाते,अभिषेक हंबर्डे,पूजा माने,पायल गोरे,वैष्णवी चव्हाण,वृषाली शिवलकर,प्राची देशपांडे, दर्शना भुरुक,कल्याणी कोंडे,कीर्ती कुंभार,किशोर पट्टेवाड,किरण जांभळे,संदीप कानगुटकर,विश्वनाथ गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय संस्कृती संवर्धक संस्था द्वारा आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी प्रमुख पाहुणे महेश पाटील,योगेश शिंदे,संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी,प्रा सागर दरेकर,डॉ रमेश कांबळे,डॉ पल्लवी गायकवाड.राजीव जोशी






















