सोलापूर – अज्ञात वाहणाच्या धडकेत एक अनोळखी इसम जागीच ठार झाल्याची घटना जुना पुणे नाका – तुळजापूर नाका रस्त्यावर आर्दा मॉल जवळ आज शनिवारी पहाटे तीन वाजता घडली .
मयत व्यक्तीचे वय 60 ते 65 वर्ष इतके असून आज शनिवारी पहाटे आर्दा मॉल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आला .ही खबर जोडभावी पेठ पोलिसांना समजली असता पोलीस हवालदार एन बी भोगशेट्टी यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात पहाटे पाच वाजेच्या सुमारास दाखल केला .
Post Views: 6