सोलापूर – मध्य प्रदेश इंदूर या ठिकाणी भारत श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचा बॉडी बिल्डर पंचाक्षरी लोणार याने 70 कि गटात सुवर्णपदक प्रप्त केले . या स्पर्धेतील गट विजेता भारत श्री म्हणून गौरविला जातो .
या स्पर्धेत देशातील 450 खेळाडू सहभागी होते . लोणार सहभाग असलेल्या महाराष्ट्र संघाने टीम चॅम्पियनशिप पटकाविले . लोणार हा इलेजियम् क्लबचा ट्रेनर आहे .
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार व सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केले .



















