बार्शी – विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्याबरोबरच सुसंस्कारित करणे ही आज काळाची गरज बनली आहे. कुटुंब, शाळा, संस्था व प्रशासन स्तरांवर संवादाची गरज आहे. काळाच्या ओघात संवाद कमी होत चालल्याने अनेक ठिकाणची प्रगती अधोगतीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे संवाद वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
गौडगाव येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गौडगावचे संस्थापक कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड, सचिव पंडितराव लोहोकरे, पंचायत समिती सदस्य संजय भड, कवी इंद्रजित पाटील, गौडगावच्या पहिल्या महिला पीएसआय सिंधुताई देशमुख, चित्रकार महेश मस्के, संस्थेचे खजिनदार मदनलाल खटोड, सहसचिव अरुण भड, संचालक जीवन लोहोकरे, प्रा. डॉ. संतोष भड, अरविंद चव्हाण, प्राचार्य सूरज काकडे, पर्यवेक्षक सुमंत जानराव, लोहोकरे गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या प्रियंका गरड उपस्थित होत्या.
जयंती सोहळ्याच्या प्रारंभी कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यानंतर कर्मवीरांच्या कार्याचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादरीकरणाने गावातून प्रभातफेरी काढली. यानंतर जयंती कार्यक्रमात छत्रपती सरफोजीराजे भोसले शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव लोहोकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय भड, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी इंद्रजित पाटील, गौडगावच्या प्रथम पीएसआय सिंधु देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त चित्रकार महेश मस्के यांचा संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस देवून गौरवण्यात आले. यानंतर सत्कारमूर्तीनी आपल्या जीवनातील संघर्ष विद्यार्थ्यासमोर मांडला. जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षक जीवराज गरड यांनी केले. प्रास्ताविक सचिव पंडितराव लोहोकरे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख संदीप चव्हाण यांनी आभार अश्विनी बुरगुटे यांनी मानले.
चौकट
शिक्षक जीवन लोहोकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अध्यक्षीय भाषणातून अध्यक्षांनी सत्कारमूर्तीच्या कार्याचे कौतुक करीत लोहोकरे गुरुजींनी आपल्या मुलापेक्षा वस्तीगृहातील निवासी मुलांवर जास्त प्रेम केले, यावेळी त्यांनी निवडक विद्यार्थ्यांची उदाहरणे देत गुरुजींच्या महान कार्याचा आढावा घेतला.
Post Views: 20