सोलापूर – सांगोला विद्यामंदिर येथे झालेल्या पुणे विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत एम.ए. पानगल अँगल उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने 19 वर्षाखालील मुलांच्या गटात उपविजेतेपद संपादिले.
उपांत्य फेरीत अहमदनगर ग्रामीण संघास हरवून त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पुणे शहरबरोबर झालेल्या कडव्या लढतीत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघास क्रीडाशिक्षक नावेद मुन्शी, इकबाल दलाल व अल्ताफ सिद्दिकी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान, फौजिया शेख, फरजाना नदाफ, फरहात शेख,जाकीर शहापुरे, रियाज सय्यद, इद्रीस पेरमपल्ली आदींनी अभिनंदन केले.
—-
उपविजेता संघ : रेहान तगाला, इम्माद काझी, सुऐबन तुळजापुरे, अब्दुल खालिक काझी, नोमान मुजावर, आमिर शेख, झोहेब बागवान, साद चौधरी, इब्राहिम शेख, अब्दुल्ला कमिशनर, मोहम्मद इनामदार, राकिब शेख.
——























