बार्शी – शहरातील राऊत चाळ परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी फॅनला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
प्रविण उर्फ बच्चन नवनाथ रिकीबे (वय ३५, रा. राऊत चाळ, बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास प्रविण रिकीबे यांच्या घरासमोरून रडण्याचा व मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे शेजारी राहणारे किरण काकडे हे घटनास्थळी गेले असता, प्रविण यांनी गेल्या २० ते २५ मिनिटांपासून स्वतःला वरच्या खोलीत कोंडून घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
त्यानंतर किरण काकडे आणि त्यांचा मित्र विनोद बोकेफोडे यांनी तातडीने वरच्या खोलीकडे धाव घेऊन बंद दरवाजा तोडला. त्यावेळी रिकीबे यांनी प्रविण खोलीतील फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले. या प्रकरणाचा हवालदार मुंडे तपास करत आहेत.
Post Views: 8