करकंब – शंभर वर्षांपासून सुरू असलेला भावई उत्सवानिमित्त.चौंडेश्वरी कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे मार्गदर्शनाखाली श्री.चौंडेश्वरी ज्येष्ठ अमावस्या दिवशीआणि समस्त करकंब कोष्टी समाज बांधवांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे १३ जुलै सोमवारी दुपारी ११:३० वा.श्री भारत वास्ते आणि लक्ष्मण वास्ते परिवाराच्या वतीने सुवासिनी पूजन आणि भोजन आयोजित करण्यात आले आहे.तसेच १४ जुलै मंगळवारी सकाळी १०:३० वा श्री चौंडेश्वरी भावई मंदिरातून निघणार असून सोमवार पेठ,मोती चौक,मेन रोड, शुक्रवार पेठ येथून दिलीप शिंदे यांचे घरी येऊन मिरवणूकीचा शेवट होऊन चौंडेश्वरी मंदिरात येते.

यावेळी ठिकठिकाणी भावईचे पूजन केले जाते.दुष्ट चंड मुंड राक्षसाने सगळीकडे थैमान मांडले होते.आई चौंडेश्वरी मातेने दुष्ट चंडमुंड राक्षसांचा वध केला.आणि तेंव्हापासून हा उत्सव विविध ठिकाणी साजरा करण्यात येतो.करकंब मध्येही हा उत्सव अनेक वर्षांपासून उत्साहात साजरा करण्यात येतो.यावेळी समस्त कोष्टी समाज बांधवांबरोबर करकंबकरही मोठ्या उत्साहात सहभागी होऊन भावईचा आनंद घेतात.प्रत्येकवर्षी समस्त श्री.चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यावेळी सर्वजण मोठ्या श्रद्धेने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतात.या उत्सवामध्ये समस्त करकंब कोष्टी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी नारायण वास्ते,प्रभाकार टेके यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र टकले,राजेंद्र करपे,प्रभाकर रसाळ,राजेंद्र नडे, चंद्रकांत रसाळ,संजय दुधाणे,जयंत टकले नवनाथ टकले,अभिजित टेके, सतिश दुधाणे,हरिश्चंद्र वास्ते,धीरज वास्ते,भुषण वास्ते,ज्ञानेश्वर दुधाणे, समस्त कोष्टी समाज बांधव,भगिनी, युवक,युवती अधिक परिश्रम घेत आहेत.
Post Views: 20