पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे म्हसवड _ पंढरपूर महामार्गावर सोलापुरहुन _ साताऱ्याकडे भरधाव वेगाने निघालेली पिक अप( एम एच 11 डि व्ही 2368) ही पहाटे साडेचारच्या सुमारास पिलीव पासुन पश्चिमेस असणाऱ्या शाॅपीग काॅमपेलक्स् मध्ये ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे घुसली.

यावेळेस त्या शाॅपीग काॅमपलेक्स च्या समोर बिहार येथुन आलेले बांधकाम कामगार झोपले होते.यातील शिरीष कुमार शहा यांच्या मांडीवर चाक जाऊन मांडी पुर्णपणे निकामी झाली तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शिरीषकुमार शहा यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सदरची पिक अप ही सातारा जिल्ह्यातील मेढा येथील असुन या गाडीचा ड्रायव्हर प्रकाश केंजळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सदरच्या घटनेची माहीती पिलीव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार स्वरुप शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा रितसर पंचनामा केला .यामध्ये संदीप मदने काॅमपलेक्स मधील इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे.तर सदरचा अपघात हा कुञा आडवा आल्यामुळे झाला असल्याचे ड्रायव्हर प्रकाश केंजळे यांनी सांगीतले. तर सदरच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

















