भोकरदन : युवराज पगारे
शेकडो वर्षांपासुन अध्यात्मिक, राजकिय, सामाजीक, आणी धार्मिक वारसा असलेल्या भोकरदन शहरासह तालुक्यातील विविध रस्त्यांवर हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, लॉजिंग आणी बिअर बारच्या नावाखाली गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर देह व्यापार सुरु असून यासह विविध अवैध धंद्यानी येथे कळस गाठला असुन या भोकरदन शहरासह तालुक्याला पोलीस प्रशासन आहे किंवा नाही हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान जवळपास दोन वर्षांपासून भोकरदन शहरामध्ये विविध अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून यामध्ये देह व्यापार, सट्टा, मटका, अवैध देशी विदेशी दारूची रस्त्यांवर विक्री, तसेच वाडी-वस्ती, हॉस्पीटल, नव्याने बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींग, एवढेच नव्हे तर चालत्या वाहनात अवैध गर्भलिंग निदान या अवैध धंद्यांना येथे मोठा ऊत आला असून याला नेमके पाठबळ कुणाचे असेल असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत असुन या सुरु असलेल्या अवैध व्यवहाराचे नवल वाटत आहे.
* किशोर वयीन मुलींसह महिलांचे शोषण *
दरम्यान विविध आणी आर्थिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या अल्पवयीन शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना पैशाचे आमिष दाखऊन त्यांचे शोषण करण्याचा प्रकार सध्या भोकरदन मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने मानवी धर्माला काळीमा फासणारी घटना दैनंदीन येथे घडत असल्याने सर्वच स्थरांवर भोकरदनच्या वैभवाला मोठा धोका असल्याचे चर्चिले जात आहे.
* जोडप्यांना पंधराशे तर अल्पवयीन असल्यास तीन हजारांचा रेट *
दरम्यान हॉटेल्स आणी लॉजिंग तसेच बिअर बार चालकांनी देह व्यापाराचा गोरखधंदा मांडला असून यामध्ये गैरकृत्य करण्यासाठी आलेल्या जोडप्याला अर्ध्या तासाचा पंधराशे रुपये तर अल्पवयीन जोडपे असल्यास तीन हजारांचा रेट असुन दिवसा काठी शहर आणि तालुका भरात याची लाखो रुपयांची बेरीज होत असल्याने याचा वाटा पोलीसांनाही जात असल्याचे एका अवैध धंद्यावाल्याने नाव न छापण्याच्या अटीवरून सांगीतले आहे.
* जिल्हाधिकारी आणी पोलीस अधिक्षक कार्यवाही करणार का?*
दरम्यान जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा भोकरदन मध्ये या पद्धतीचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असतांना याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित होऊन देखिल अवैध धंद्याना मोठा ऊत आला असुन याला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणी पोलीस अधिक्षक यावर कार्यवाही करणार का असाप्रश्न उपस्थित केला जात आहे.


![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=120%2C86&ssl=1)




















