मोडनिंब – माढा तालुक्यातील भेंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रभाकर रामभाऊ दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी प्रभाकर रामभाऊ दळवी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी दळवी यांनी बोलताना गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी सरपंच डॉ. मनीषा दळवी, उपसरपंच विमल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य उषा मते, राजमती जाधव, माजी सरपंच डॉ. संतोष दळवी ,बाळासाहेब भोगे, ज्ञानदेव दळवी, बाळासाहेब सावंत, बिभीषण दळवी, विठ्ठल सावंत, युनुस मुलाणी, अशोक साळुंखे, सोमनाथ आवटे, बचन जाधव, महेंद्र शिंदे, जयसिंग दळवी, हरिभाऊ दळवी, सयाजी लोखंडे, अपाराव परबत, प्रवीण गायकवाड ,महादेव दळवी,महेश मते,शिवाजी सावंत,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.भेंड मधील ग्रामस्थांनी वतीने दळवी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल दळवी यांचे अभिनंदन केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























