श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या बेंगलोर येथील आर्ट आँफ लिव्हींग इंटरनॅशनल आश्रम येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच सतसंग संपन्न झाले.
एका विशेष कार्यक्रम साठी औसेकर महाराजांना आश्रमात सतसंग साठी निमंत्रित केले होते रविशंकर गुरुजी व गहिनीनाथ महाराज यांचा अनेक वर्षापासून संपर्क आहे. आजच्या धावपळीच्या जगात माणसाला आध्यात्मिक साधना शक्तीच स्थिर करु शकते आणि यातूनच जगा चे कल्याण व मानव जाती चे उध्दार होवू शकते. श्री श्री रविशंकर गुरुजी नी भारतीय वेद शास्त्राचा प्रचार जगभर करून वेदा चा आभ्यास करणारा एक वर्ग तयार केला सामान्य लोकांना ‘ जीवन जगण्या ची कला ‘ याचा मंत्र देवून त्यांचे जीवन समृद्ध केले. आशा अनेक अवघड गोष्टी गुरुजी नी साधका साठी सोप्या केले आहेत भारतीय सनातन ऋषीं परंपरे ला जगभर उजाळा दिला.असे गहिनीनाथ महाराज यांनी सतसंगात सांगितले. या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील साधक उपस्थित होते. लवकरच रविशंकर गुरुजी नी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येण्याचे मनोदय बोलून दाखविले.
या प्रसंगी आर्ट आँफ लिव्हींग परिवार च्या वतीने गहिनीनाथ औसेकर यांचा सन्मान करण्यात आला.
Post Views: 6