उमरखेड शालेय समिती अध्यक्षपदी प्रसाद जाधव तर उपाध्यक्षपदी गजानन कडूकर…..
मंठा प्रतिनिधी:- उमरखेडा ता.मंठा येथील जिल्हा परिषद शाळेची शालेय समितीची निवड झाली काल (ता.23) मंगळवार रोजी करण्यात आली या वेळी शालेय समितीचे अध्यक्षपदी प्रसाद जाधव याची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गजानन कडूकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर सदस्यपदी सो. शारदा गुलाब डोंबे,सो.ज्योती गजानन जाधव, सो.प्रभा दत्ता सांगोळे,संतोष वाघ,गजानन शिंदे,विष्णु पंढरे, सो.जया विकास जाधव,सो.मनाली विशाल जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी उमरखेडा सरपंच आनंद जाधव,उपसरपंच प्रतापराव जाधव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.या वेळी रामभाऊ जाधव,रवींद्र राठोड,गंगाधर शिंदे,सावता विधाते,गजानन डोंबे,रामेश्वर धारकर,धोंडीबा मस्के, अशोक पंढरी,दौलत जाधव,नारायण डोंबे,शाळेचे मुख्याध्यापक श्री गोंदडवाड, श्री राठोड,श्री वायाळ यांची उपस्थिती होती.


![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=120%2C86&ssl=1)




















