सांगोला – तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन २०२६ आढावा बैठक आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती पुनम इंगवले, उपसभापती अजय सरगर, गट विकास अधिकारी वसंत फुले, कृषि अधिकारी बाबर, पंढरपूर उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, सहायक निबंधकचे पुजारी, महावितरणचे दिघे उपस्थित होते. खरीप हंगामपूर्व नियोजन तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी सादर केले. यामध्ये वर्षभर राबविण्यात येणाऱ्या मोहिमा, कृषी विभागाच्या सर्व योजना, मागील वर्षातील साध्य व सन २०२६-२७ या वर्षाचे नियोजन सादर केले.
याप्रसंगी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मनोगतात येणाऱ्या प्रतिकूल हवामानाशी सर्वांनी एकजुटीने सामना करूया व शेतकरी बांधवांना समृद्ध करूया असे मत व्यक्त करत येणाऱ्या खरीप हंगामाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर बैठकीचे सूत्रसंचलन श्रीधर शेजवळ यांनी केले. आभार अमोल अभंग यांनी मानले. यावेळी सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहायक कृषि अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकरी बांधव उपस्थित होते.


























