सोलापूर – जात पडताळणी संदर्भामध्ये मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. समन्वयक रवी मोहिते, मनीष सूर्यवंशी व सहकारी सोलापूर जिल्हा व करमाळा तालुक्यातीलही बांधवांनी मिळून अखंड मराठा समाजाच्या वतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्कार केला.
रवी मोहिते यांनी आपली भूमिका घेऊन जात पडताळणी संदर्भामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे असेही कलेक्टर यांना सांगितल. कलेक्टर यांनी तात्काळ पडताळणी ऑफिस संदर्भामध्ये संबंधितांना तात्काळ फोन लावून जात पडताळणी तात्काळ करून मिळाव्या असे आदेश दिले.
कुणबीधारकांच्या जात पडताळणी करताना वारंवार त्रृटी काढून प्रकरणे रिजेक्ट का होतात असाही प्रश्न यावेळी विचारला. या पुढील काळामध्ये अडचण येणार नाही असेही कलेक्टर यांनी आश्वासन दिले.



























