सोलापूर : बकरी ईद-२०२६च्या अनुषंगाने मागील एका वर्षात गोवंश हत्या, तस्करी, वाहतूक संबंधित दाखल गुन्हयातील एकुण ८६ आरोपींवर पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे .
या ८६ आरोपींपैकी चार आरोपींना भारतीय नागरिक संहिता कलम १६३ (२) प्रमाणे आठ दिवसांकरिता शहर हद्दीतून बाहेर केले आहे. याचा गुन्ह्यातील दोन आरोपींनी बंधपत्राचे उल्लंघन केल्याने त्यापैकी एका आरोपीची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे, तर अन्य एका आरोपीकडून २५ हजारांचा दंड आकारून शासनाकडे जमा करण्यात आला आहे.
Post Views: 4