—————————————-
लोहा
श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे वाणिज्य विभागांचे प्रमूख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळांचे सदश्य प्रा. डॉ धनंजय माणिकराव पाटील पवार यांचा व्यंकटेश गार्डन मंगल कार्यालय येथे सेवापुर्ती गौरव संभारभ सपन्न झाला.
लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांनी श्री संत गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना कार्यात मोलाचे सहकार्य केले. माजी खा.डॉ. कै. केशवराव धोंडगे यांच्या परिश्रमातून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली या सोबत सचिव माजी आ.गुरूनाथ कुरुडे यांचाही मोलाचा वाटा होता. वाणिज्य विभागाचे प्रमुख व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वाणिज्य अभ्यास मंडळ सदस्य प्रा.डाॅ. धनंजय माणिकराव पाटील पवार यांनी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार.१ जुलै रोजी सेवा निवृत्त झाले.
या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी आ. गुरुनाथ कुरुडे तर प्रमुख अतिथी शिवसेनेचे एकनाथ दादा पवार, संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरूषोत्तम धोंडगे,प्राचार्य अशोक गवते,ऑड. किशनराव माणिकराव पवार, माजी नगरसेवक वसंत विठ्ठलराव पवार, उपविभागीय अभियंता मोहन विठ्ठलराव पवार, माजी नगराध्यक्षा जिजाबाई व्यंकटराव मुकादम, माणिकराव व्यंकटराव मुकादम,नारायण व्यंकटराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष केशवराव व्यंकटराव मुकादम, माधव व्यंकटराव मुकादम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार,माजी शिक्षण सभापती संजय पाटील क-हाळे, माजी नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, मनोहर भोसीकर, दिनेश तेललवार,बी.डी.जाधव,
बोंडारे,संदिप चव्हाण,भारत पवार,डॉ.डी.बी.कानवटे,तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटफलेवार,प्रा. डॉ.धनंजय पवार यांच्या पत्नी सौ. पद्दमीनबाई धनंजय पवार, डॉ.कपिल धनंजय पवार, अंजली मनोज बिरादार,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, मधुकर पाटील पवार, डॉ.कल्याण पाटील पवार, अविनाश पाटील पवार, डॉ.गजानन पाटील पवार, मोगु पाटील पवार, माजी नगरसेवक भास्करराव पाटील पवार, सचिन मुकादम, अभियंता संतोष क्षीरसागर, मंगेश क्षीरसागर, यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी , मित्रमंडळ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.