न्यायदल पक्षप्रमुख मदनराव खंदारे यांची उपोषणाद्वारे
मंठा प्रतिनिधी : महाराष्ट्रातील भूमिहीन कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये दुष्काळी अनुदान देण्यात यावे. अशी मागणी न्यायदल पक्षप्रमुख मदनराव गुलाबराव खंदारे यांनी केली आहे.सदर मागणी मान्य करण्यात यावी , यासाठी खंदारे यांनी मंठा तहसील कार्यालयासमोर तारीख 4 गुरुवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
सरकारसह प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ भूमीहीनांना अनुदान देण्याची घोषणा करावी असे त्यांनी यावेळी सांगितले. न्यायदल पक्षप्रमुख मदनराव खंदारे हे सर्व सामान्य सह शेतकऱ्यासह कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी न्यायदल पक्षाच्या माध्यमातून करत आहेत.