सांगोला – महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.जगदिश चेडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचेकडून पीएच.डी पदवी प्राप्त झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कोवीड-१९ लॉकडाऊन पूर्वी, दरम्यान व नंतरच्या शारीरिक हालचालींचा सर्वेक्षणात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. त्यांना डॉ.अफसर शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खजिनदार नागेश गुळमिरे, सदस्य महादेव झिरपे, सोमनाथ ढोले, रावसाहेब ताठे, डॉ.संजीवनी केळकर, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल साहेबराव ढेकळे व डॉ.सुरेश भोसले यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.