श्रीपूर – देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावत देशाचे संरक्षण करणारे सैनिक, जवान तसेच २४ तास जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले पोलीस यांच्याप्रती बहीण-भावाच्या प्रेमाचा संदेश म्हणून येथिल शहीद जवान निवृती जाधव प्रतिष्ठानच्या वतीने पोस्ट खात्याच्या माध्यमातून राख्या पाठविणेत आल्या . प्रतिष्ठान गेल्या १६ वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम राबवत आहे. घरापासून दूर असलेल्या सैनिकांना आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अनेकदा आपल्या कुटुंबीयांसोबत सण-उत्सव साजरे करता येत नाहीत. ही भावना लक्षात घेऊन राखी पौर्णिमेच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला जातो .
या उपक्रमात प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे, सचिव सारिका नाईकनवरे, सदस्य विजया नाईकनवरे, नगरसेविका तेजश्री लाटे, हर्षदा नाईकनवरे या महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. धर्मेश जाधव आणि माधव साठे सर यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.
या वेळी श्रीपूरचे पोस्टमास्तर अश्विनी शेटे, असिस्टंट पोस्टमास्तर पुनम सोनार, पोस्टमन शितल येवले आणि पॅकर सुरज कुंटे यांनी राख्या पाठविण्यासाठी चांगली व्यवस्था व सहकार्य केले. त्यामुळे महिला भगिनींकडून पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
गेली १६ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमातून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
या उपक्रमासाठी श्रीपूर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर अश्विनी शेटे, असिस्टंट पोस्टमास्तर पुनम सोनार, पोस्टमन शितल येवले आणि पॅकर सुरज कुंटे यांनी राख्या पाठविण्यासाठी चांगली व्यवस्था व सहकार्य केले. त्यामुळे महिला भगिनींकडून पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यातआले .
Post Views: 38